सकाळ डिजिटल टीम
शेफची सफेद टोपी म्हणजे स्वच्छता व स्वयंपाकघरातील शुद्धतेचे प्रतीक.
टोपीचा आकार व उंची शेफच्या दर्जानुसार असतो मुख्य शेफची टोपी सर्वात उंच!
टोपी केस आटोक्यात ठेवते, अन्नात केस न पडण्याचा धोका कमी करते.
टोपीवरच्या घड्या म्हणजे त्याच्या कौशल्याच्या टप्प्यांचे प्रतीक काही टोपींवर १०० घड्या असतात!
टोपीमुळे डोकं थंड राहतं आणि स्वयंपाक करताना उष्णतेपासून थोडसं संरक्षण मिळतं.
टोपी घालण्याची परंपरा 16व्या शतकापासून चालत आलेली आहे, राजदरबारातील शेफ टोपी घालत.
सर्व शेफ एकसारखे दिसावेत यासाठी युनिफॉर्मचा भाग म्हणून टोपी वापरली जाते.
टोपी म्हणजे शेफचा दर्जा, सन्मान आणि अनुभवाचे प्रतीक मानले जाते.