विमानात केबिन क्रू प्रवाशांना बाहेरच्या तापमानाची माहिती का देतात?

Amit Ujagare (अमित उजागरे)

1) विमानानं प्रवास करणं खूपच रोमांचित करणार असतं. लांबच्या प्रवासासाठी विमान प्रवास सर्वाधिक चांगला आहे.

2) विमानात प्रवास करताना अनेक बाबींची काळजी घेणं गरजेचं असतं.

3) विमानाच्या टेकऑफवेळी आणि लँडिंगवेळी केबिन क्रू प्रवाशांना विविध प्रकारची माहिती देत असतात.

4) यामध्ये बाहेरचं तापमान कसं असेल? याचीही माहिती दिली जाते. पण ही माहिती का दिली जाते? पाहुयात

5) विमानाचं लँडिंग होण्यापूर्वी पायलटकडे बाहेरच्या हवामानाची संपूर्ण माहिती असते. उदा. लँडिंगच्या एअरपोर्टची हवा, तापमान.

6) कारण पायलटला बाहेरच्या तापमानाचा अंदाज घेऊनच लँडिंग करावं लागतं. वातावरण खूपच बिघडलेलं असेल तर लँडिंग करताना अडचणी येऊ शकतात.

7) तसेच बाहेरचं वातावरण कसं आहे? हे कळाल्यास प्रवाशी त्याप्रमाणं स्वतःची मानसिक तयारी करु शकतात.

8) त्यानुसार, जर बाहेर पाऊस असेल किंवा बर्फ पडत असल्यानं खूपच थंडी असेल किंवा खूपच गरमी असेल तर प्रवाशांना त्याप्रमाणं कपडे परिधान करता येऊ शकतात.

९) बऱ्याचदा प्रवाशी एखाद्या थंड प्रदेशातून उड्डाण करुन खूपच उष्ण प्रदेशात उतरत असतात त्यामुळं त्यांना त्रास होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते.