साप वारंवार जीभ बाहेर काढतो, त्यातून त्याला काय समजतं?

संतोष कानडे

साप वारंवार जीभ बाहेर काढून हवेत आणि जमिनीवर असलेले अतिसूक्ष्म रासायनिक कण गोळा करतो.

त्याच्या जिभेच्या दोन्ही टोकांवर हे कण जमा होतात. त्यानंतर साप ही जीभ तोंडाच्या आतील विशेष अवयवाला स्पर्श करतो.

या अवयवाला 'जेकबसन ऑर्गन' किंवा 'व्होमेरोनाझल ऑर्गन' म्हणतात.

हा अवयव गोळा केलेल्या रासायनिक संकेतांचे विश्लेषण करतो.

यामुळे सापाला आसपास भक्ष्य आहे का, याचा अंदाज येतो.

परिसरात दुसरा साप गेला आहे का, याचीही त्याला माहिती मिळू शकते.

मादी सापाने सोडलेले रासायनिक संकेत ओळखून नर साप तिचा माग काढू शकतो.

सापाची जीभ दोन टोकांची असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या दिशांनी आलेले संकेत समजण्यास मदत होते.

सापासाठी जीभ हे आजूबाजूच्या जगाचा रासायनिक नकाशा समजून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे