सकाळ वृत्तसेवा
देशभरात पोलीस खात्याचा युनिफॉर्म म्हणजे खाकी रंग, बूट आणि टोपी… पण काही राज्यांमध्ये यामध्ये विशेष वेगळेपण दिसतं.
जिथे सगळीकडे खाकी, तिथं कोलकात्याचे पोलीस पांढऱ्या रंगात दिसतात. तर पॉंडीचेरीचे पोलीस लाल टोपी घालतात. का बरं?
कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी. इथं राज्य पोलीस आणि कोलकाता पोलीस असे दोन स्वतंत्र गट आहेत. कोलकाता पोलिसांची स्थापना ब्रिटीशांनी 1845 मध्ये केली होती.
कोलकाता हे दमट हवामानाचं शहर. इथं उकाडा फार जास्त. ब्रिटीशांनी पोलिसांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म दिला.
पांढरा रंग उष्णतेचं परावर्तन करतो. त्यामुळे कोलकाता पोलीस उष्णतेतही आरामात ड्युटी करू शकतात. आजही ही परंपरा टिकून आहे.
पॉंडीचेरी पोलिसांचा युनिफॉर्म खाकीच आहे. पण त्यांची टोपी लाल रंगाची असते. यामागेही इतिहास दडलेला आहे.
स्वातंत्र्यापूर्वी पॉंडीचेरी ही फ्रेंचांची वसाहत होती. फ्रेंच सैन्यात ‘लाल केपी कॅप’ परिधान केली जात होती – तीच पद्धत इथंही आली.
पॉंडीचेरी स्वतंत्र झाल्यानंतरही, लाल टोपी घालण्याची फ्रेंच परंपरा पोलिसांनी कायम ठेवली आहे.
कोलकात्याचा युनिफॉर्म विज्ञानावर आधारित आहे, तर पॉंडीचेरीचा इतिहासावर. देशासाठी युनिफॉर्म समान असावा, की स्थानिक मुद्याला मान द्यावा? हा चर्चेचा मुद्दा आहे.