Sandip Kapde
डी मार्ट सध्या सामान्य लोकांसाठी एक महत्त्वाचा खरेदीचा पर्याय बनला आहे.
बहुतांश ग्राहक खरेदीसाठी डीमार्टचा पर्याय निवडतात
अनेक वस्तूंवर मिळणाऱ्या सवलतीमुळे लोक डी मार्टची निवड करतात
पण तुम्हाला माहिती आहे का, डी-मार्टमधून बाहेर पडताना सिक्युरिटीचे कर्मचारी बिल आणि ट्रॉलीकडे का पाहतात?
डी मार्टमध्ये बिलिंग पूर्ण झाल्यानंतर आपण खरेदी केलेले सामान कॅरी बॅग्समध्ये भरतो.
जर तुम्ही डीमार्टकडून कॅरी बॅग्स घेतल्या, तर प्रत्येक पिशवीसाठी डीमार्ट काही शुल्क आकारते.
पण जर तुम्ही तुमच्या घरातून पिशव्या घेऊन गेलात, तर कोणतेही शुल्क लागणार नाही.
तुम्ही पिशव्या घरून आणा किंवा तिथेच खरेदी करा.
डी मार्टच्या बिलावर बिलिंग करणारी व्यक्ती पेनाने नोंद करते.
उदाहरणार्थ, C3 किंवा C2 म्हणजे कॅरी बॅग तीन किंवा कॅरी बॅग दोन.
सिक्युरिटी जवळ गेल्यावर ते प्रथम बिलावर नमूद केलेल्या कॅरी बॅग्सची संख्या तपासतात.
आणि सामनाच्या ट्रॉलीमध्ये नेमक्या तेवढ्याच पिशव्या आहेत याची खात्री करून घेतात, जेणेकरून चोरीसारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध करता येईल.