ऑपरेशन करताना डॉक्टर्स हिरव्या रंगाचे कपडे का घालतात?

रोहित कणसे

आपण नेहमी पाहातो की डॉक्टर पांढरा कोट घालतात पण जेव्हा ते सर्जरी करत असतात तेव्हा ते निळा किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालतात.

अनेकांना प्रश्न पडत असेल की ऑपरेशन थियटरमध्ये हिरव्या रंगाच्याच कपड्यांचा का वापर केला जातो? हेच आपण जाणून घेणार आहोत.

history of surgical green uniforms

आधी डॉक्टर्स ऑपरेशन करतेवेळी देखील पांढरे कपडे घालत होतं, मात्र २०व्या शतकाच्या सुरूवातीला काही डॉक्टरांनी हिरवे कपडे घालण्यास सुरूवात केली.

history of surgical green uniforms

ऑपरेशन थियटरमध्ये जाताना हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालण्यामागे एक वैज्ञानिक कारण दडलं आहे.

history of surgical green uniforms

मीडिया रिपोर्टनुसार हिरवा रंग डोळ्यांना आरामदायक असतो आणि तणाव कमी करतो. सोबतच डॉक्टर्सची मानसिक स्थिती देखील स्थिर राहाते.

history of surgical green uniforms

मन शांत राहिल्याने डॉक्टर व्यवस्थितपणे ऑपरेशन करू शकतात.

history of surgical green uniforms

तज्ज्ञांच्या मते अनेकदा डॉक्टर्सना खूप जास्त काळ ऑपरेशन थियटरमध्ये राहवे लागते.

history of surgical green uniforms

अशावेळी डॉक्टरांना अनेकदा रक्त पाहावे लागते, खूपवेळापर्यंत लाल रक्त पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर ताण येतो.

history of surgical green uniforms

अशावेळी फोकस करणे शक्य होत नाही, अशावेळी ऑपरेशन थियटर्समध्ये डॉक्टर हिरव्या रंगाचे कपडे घालतात.

history of surgical green uniforms

रॅपर नाही तर बिग बॉसची शेरनी आर्या जाधवने घेतलंय 'या' क्षेत्रात शिक्षण

येथे क्लिक करा