सकाळ डिजिटल टीम
आपण लहानपणापासून एकत आलो आहोत की मांजरीला वाघाची मावशी म्हंटले जाते. पण का म्हंणतात काय आहेत या मागची कारणं जाणून घ्या.
मांजर आणि वाघ हे दोघेही फेलिड (Felidae) कुळातील आहेत. या कुळातील सर्व प्राणी मांसाहारी असून, त्यांच्या शरीराची रचना, शिकार करण्याची पद्धत आणि वागण्यात अनेक समानता आहेत. असे म्हंटले जाते.
दोघेही दबा धरून शिकार करतात. मांजर जशी शांतपणे उंदराच्या किंवा पक्ष्याच्या जवळ जाते, त्याचप्रमाणे वाघही मोठ्या प्राण्याची शिकार करताना सावधगिरीने वावरतो.
दोन्ही प्राण्यांचे शरीर अत्यंत लवचिक असते. वाघ जसा सहजतेने वळतो आणि झेप घेतो, त्याचप्रमाणे मांजरही उंच उड्या मारते किंवा लहान जागेतून सहज निघून जाते.
मांजर आणि वाघ दोघेही शिकार करण्यापूर्वी किंवा धोक्याचा अंदाज आल्यास लपून बसतात. झाडीत वाघ लपतो, तर मांजर घरात किंवा झुडपांमध्ये लपून बसते.
दोन्ही प्राण्यांचे पंजे आत-बाहेर होतात (retractable claws). यामुळे ते शांतपणे चालतात आणि शिकार पकडताना पंजे बाहेर काढून घट्ट पकड मिळवतात.
वाघाची गर्जना भीतीदायक असते, तर मांजर गुरगुरते (purr). हे दोन्ही आवाज त्यांच्यातील समान नैसर्गिक गुणधर्मांचे आणि त्यांच्या शिकारीच्या वर्तनाचे संकेत देतात.
दोघांचेही डोळे रात्रीच्या वेळी चमकतात. रात्रीच्या अंधारातही त्यांना शिकार दिसू शकते. या डोळ्यांची रचना आणि त्यांची तीक्ष्ण दृष्टी या दोघेही शिकारी प्राणी असल्याचा पुरावा आहे.
या सर्व कारणांमुळे मांजरीला वाघाची मावशी म्हटले जाते, कारण या दोघांच्या स्वभावात, हालचालीत आणि शारीरिक रचनेत अनेक समान धागे आहेत.