Payal Naik
भीमराव रामजी आंबेडकर यांनी भारतासाठी दिलेलं योगदान हे अमूल्य आहे. त्यांनी वंचित समाजासाठी शिक्षणाची वाट मोकळी करून दिली.
त्यांनी जगाला बुद्ध शिकवला. बौद्ध धर्माची शिकवण दिली. मात्र त्यासाठी आंबेडकरांनी निळा रंगच का निवडला?
आंबेडकर शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने १९४२ मध्ये फडकवलेल्या पक्षाच्या ध्वजाचाही रंग निळा होता.
नंतर 1956 मध्ये जेव्हा आधीचा पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली तेव्हा त्यालाही तोच निळा झेंडा देण्यात आला
बाबासाहेबांचे पुतळे देखील नेहमी निळ्या रंगाच्या सुटाबुटातले असतात. मात्र असं का?
निवृत्त आयपीएस अधिकारी आणि आघाडीचे वंचित कार्यकर्ते एसआर दारापुरी यांनी बाबासाहेबांच्या निळा रंग निवडण्यामागचं कारण सांगितलं.
यामागे बाबासाहेबांना निळा रंग आवडत होता हे एकच कारण नाहीये. तर निळा हा आकाशाचा रंग आहे.
आभाळ म्हंटलं की विशालता आली. त्यामुळे निळा रंग विशालता दर्शवतो. हीच भावना बाबासाहेबांची देखील होती.
त्यामुळे या निळ्यारंगाद्वारे त्यांनी संपूर्ण वंचित समाजाला शिकून हे आभाळ कवेत घेण्याची शिकवण दिली.