सोनं स्वस्त का होत आहे? कारण जाणून घ्या

Mansi Khambe

गुंतवणूक

संकटाच्या काळात सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, परंतु सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने घसरत आहेत.

Gold Price Drop Reason

|

ESakal

सोन्याची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, कॉमेक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस ४१६६.४० डॉलरपर्यंत, तर देशांतर्गत बाजारातही प्रति १० ग्रॅम १.४८ लाख रुपयांपर्यंत खाली आली आहे. या घसरणीमागील कारणे पाहा.

Gold Price Drop Reason

|

ESakal

कारण

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची हालचाल अमेरिकन डॉलरच्या कामगिरीवर अवलंबून असते. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा इतर देशांचे चलन वापरणाऱ्या खरेदीदारांसाठी महाग होतो.

Gold Price Drop Reason

|

ESakal

खरेदीत घट

यामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या खरेदीत घट होताच परिणामी किमतीत घट होते. अमेरिकन बाँड यील्ड्समधील वाढीमुळेही सोन्याची किंमत कमी झाली आहे.

Gold Price Drop Reason

|

ESakal

नफावसुली

बाजारातील या नफावसुलीच्या दबावामुळे किमतींमध्ये मोठी घसरण झाली. व्याजदरांच्या शक्यतेचा सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तेच्या मागणीवर नकारात्मक परिणाम होतो.

Gold Price Drop Reason

|

ESakal

नाकेबंदी उठवणे

सोमवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकेबंदी उठवण्याच्या बदल्यात होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचा आणि अणुचर्चा पुन्हा सुरू करण्याचा इराणचा प्रस्ताव फेटाळला.

Gold Price Drop Reason

|

ESakal

घसरण

या नव्या राजनैतिक भूमिकेमुळे COMEX वरील सोन्याच्या किमती ४,२०० डॉलर प्रति औंस या मानसिक पातळीच्या खाली घसरल्या, ज्यामुळे बाजारातील अनिश्चितता आणखी वाढली.

Gold Price Drop Reason

|

ESakal

मागणीत घट

देशांतर्गत, भारतातील सोन्याची मागणी काहीशी मंदावलेली आहे. आगामी सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी, सराफा व्यापारी आणि ग्राहक भावात आणखी घट होण्याची वाट पाहत आहेत.

Gold Price Drop Reason

|

ESakal

कमकुवतपणा

किरकोळ मागणीतील या कमकुवतपणामुळे, भारतीय बाजारातील घसरणाऱ्या सोन्याच्या किमतींना आधार मिळण्याऐवजी, त्या आणखी खाली ढकलल्या गेल्या आहेत.

Gold Price Drop Reason

|

ESakal