जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केसात कोंडा होतो का? तज्ञ काय म्हणतात...

Saisimran Ghashi

हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर


हिवाळ्यात बहुतेक लोक आंघोळ व केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात.

गरम पाण्याचे दुष्परिणाम


जास्त गरम पाण्याने केस धुतल्याने केस कोरडे होतात, केस गळणे, खाज सुटणे आणि कोंडा वाढू शकतो.

esakal

डॉक्टरांचे मत


दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल यांच्या मते, गरम पाणी टाळूचा नैसर्गिक ओलावा काढून टाकते.

esakal

कोंडा का होतो


टाळू कोरडी झाल्याने मृत त्वचा पेशी सोलून पांढऱ्या फ्लेक्सच्या स्वरूपात बाहेर पडतात, यालाच कोंडा म्हणतात.

esakal

कोमट पाण्याचा सल्ला


गरम पाण्याऐवजी नेहमी कोमट (lukewarm) पाण्याने केस धुवावेत.

esakal

गरम पाण्याची वेळ


टाळूवर गरम पाणी जास्त वेळ राहू देऊ नये, त्यामुळे ओलावा कमी होतो

esakal

केस धुण्याची योग्य पद्धत


आठवड्यातून फक्त १-२ वेळा सौम्य अँटी-डँड्रफ शॅम्पूने केस धुवावेत.

esakal

उपाय आणि खबरदारी


केस धुण्यापूर्वी तेल लावावे, कंडिशनर वापरावे आणि कोंडा खूप जास्त असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

esakal

कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? जाणून घ्या मेष ते मीन, 12 राशींचे राशीभविष्य..

horoscope 17 november 2025 astrology prediction today

|

esakal

येथे क्लिक करा