Vrushal Karmarkar
अनेकांना फ्लाइट दरम्यान खाण्यापिण्याशी संबंधित नियम माहित नसतात. अशा परिस्थितीत प्रवासाची मजा तर खराब होतेच पण तुम्ही कायदेशीर अडचणीतही अडकू शकता.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्लाइटमध्ये सोबत नेण्यास परवानगी नाही. नारळ देखील त्यापैकी एक आहे, जे तुम्ही विमानाने प्रवास करताना सोबत घेऊ शकत नाही.
तुम्ही ते सोबत घेतले तरी तुम्हाला ते विमानतळावर फेकून द्यावे लागेल किंवा मोठा दंड भरावा लागेल. खरे तर दुबईसह अनेक विमान कंपन्यांनी नारळावर बंदी घातली आहे. या मागचे कारण जाणून घेऊया.
तुम्हालाही प्रश्न पडत असेल की विमान प्रवासात नारळ घेण्यास बंदी का असेल ? पुजा आणि विधीमध्ये हे आवश्यक असले किंवा तुम्हाला ते खायला खूप आवडत असले तरी विमानाने प्रवास करताना ते घेण्यास सक्त मनाई आहे.
या बंदीमागील कारण म्हणजे नारळ ज्वलनशील फळ आहे. नारळ कधीही पेटू शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल आढळून येत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव याला ज्वलनशील पदार्थाच्या श्रेणीत ठेवण्यात आले असून विमान प्रवासात ते नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नारळाशिवाय बंदुका, अग्निशस्त्रे, स्फोटक पदार्थ, ज्वलनशील पदार्थ, चाकू, स्वसंरक्षणाशी संबंधित साधने, सॅटेलाइट फोन, तंबाखू, गांजा, हेरॉइन आणि अल्कोहोल यासारख्या अनेक गोष्टी सोबत घेऊन जाण्याची परवानगी नाही. इंधनाशिवाय लाइटर आणि ई-सिगारेट काही नियमांच्या अधीन असू शकतात.