सकाळ डिजिटल टीम
श्री कृष्णांच्या हातात बासरी असणे हे केवळ एक वाद्य नसून, अनेक प्रतीकात्मक आणि आध्यात्मिक अर्थ दर्शवते. पण बासरी ही श्री कृष्णांची ओळख का आहे या मागची नेमकी कारणं काय आहेत जाणून घ्या.
बासरीचा गोड आणि मोहक सूर राधा आणि गोपिकांना कृष्णाकडे आकर्षित करत असे. हा सूर केवळ एक संगीत नसून, आत्म्याला परमात्म्याकडे आकर्षित करणारा दैवी प्रेमाचा आणि भक्तीचा संदेश आहे आसे मानले जाते.
बासरी पोकळ असते आणि तिच्यातून सूर निर्माण होण्यासाठी कृष्णाला तिच्यावर श्वास फुंकावा लागतो. हे मानवी जीवनाचे प्रतीक आहे, जे अहंकार सोडून पूर्णपणे भगवंताला समर्पित झाल्यावरच आनंदाचा सूर निर्माण करू शकते.
बासरी आतून रिकामी असते. हे माणसाच्या अंतर्मनातील पोकळपणाचे प्रतीक आहे, जोपर्यंत मनुष्य स्वतःला पूर्णपणे रिक्त करत नाही, तोपर्यंत त्यात भगवंताचा वास होत नाही. असे म्हंटले जाते.
कृष्णाच्या बासरीचा सूर ऐकून केवळ मनुष्यच नव्हे, तर पशू, पक्षी आणि निसर्गही मंत्रमुग्ध होत असे. हा सूर प्रेम आणि सौहार्दाने सर्वांना एकत्र आणण्याचे प्रतीक आहे.
बासरी बांबूपासून बनलेली असते, जी निसर्गाशी जोडलेली आहे. हे कृष्णाच्या साध्या आणि नैसर्गिक स्वभावाचे प्रतीक आहे, जो राजेशाही थाटापेक्षा गोकुळातील साधे जीवन जगत होता.
कृष्ण प्रत्यक्ष समोर नसतानाही, त्याच्या बासरीचा सूर सर्वत्र ऐकू येत असे. हे दाखवते की कृष्ण सर्वत्र आणि प्रत्येक कणात उपस्थित आहेत.
बासरीचा प्रत्येक सूर मानवी जीवनातील चढ-उतारांचे प्रतीक आहे. बासरीतून बाहेर पडणारा मधुर सूर, जीवनातील अडचणींवर मात करून मिळणाऱ्या आनंदाचा संदेश देतो. असे म्हंटले जाते.
कृष्णाने बासरी ही निवडली, कारण ती पोकळ आणि साधी होती. हे दाखवते की देव नेहमी साधेपणा आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देतो, दिखाऊ आणि भव्य वस्तूंना नाही.