श्रीकृष्णांना मोरपिस का प्रिय आहे?

सकाळ डिजिटल टीम

मोरपिस

श्रीकृष्णांना मोरपिस का प्रिय आहेत? या मागची कारणं काय आहेत जाणून घ्या.

Lord Krishna | sakal

कृतज्ञता

एका कथेनुसार, एकदा श्रीकृष्ण बासरी वाजवत असताना, त्यांच्या संगीताने प्रभावित झालेल्या मोरांनी त्यांना आपले पीस अर्पण केले. हे पीस श्रीकृष्णाने कृतज्ञता म्हणून धारण केले.

Lord Krishna | sakal

प्रेमाचे प्रतीक

मोरपीस हे राधा आणि कृष्णाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानले जाते, कारण राधेला मोर अतिशय प्रिय होते.

Lord Krishna | sakal

विद्येचे प्रतीक

मोर हे देवी सरस्वतीचे वाहन आहे. त्यामुळे मोरपीस हे ज्ञान आणि विद्येचे प्रतीक मानले जाते, जे श्रीकृष्ण धारण करतात.

Lord Krishna | sakal

विजयाचे प्रतीक

मोर हा ब्रह्मचर्याचे पालन करतो, अशी प्राचीन मान्यता आहे. त्यामुळे मोरपीस पवित्रता, शुद्धता आणि वासनेवर विजयाचे प्रतीक आहे.

Lord Krishna | sakal

आकर्षक रंग

मोरपीसाचे आकर्षक रंग श्रीकृष्णाच्या सौंदर्याला आणि त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाला अधिक मोहक बनवतात.

Lord Krishna | sakal

नात्याचे प्रतीक

मोरपीस हे निसर्गाशी असलेल्या श्रीकृष्णाच्या जवळच्या नात्याचे प्रतीक आहे. ते जीवनातील विविध रंग आणि भावना दर्शवते.

Lord Krishna | sakal

विनम्रता

मोरपीस धारण करून श्रीकृष्ण आपली विनम्रता दर्शवतात. ते स्वतः देव असूनही निसर्गातील एका लहान पक्ष्याचा सन्मान करतात. असे म्हंटले जाते.

Lord Krishna | sakal

सौभाग्य

हिंदू धर्मात मोरपीस खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरात किंवा सोबत मोरपीस ठेवल्याने सौभाग्य लाभते, अशी धारणा आहे.

Lord Krishna | sakal

नाशिक मधील प्रसिद्ध स्वामीनाराय मंदिर पहिलं का?

Swaminarayan Temple | sakal
येथे क्लिक करा