Saisimran Ghashi
पंढरपूर हे भारतातील एक प्राचीन व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जिथे प्रतिवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात.
इथे भक्त विटेवर उभ्या असलेल्या परब्रह्म, म्हणजेच श्री विठोबाचे दर्शन घेतात.
पंढरपूरचा ज्ञात इतिहास सुमारे पाच हजार वर्षांचा असल्याचे सांगितले जाते.
पद्म पुराणानुसार, रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवनात (आजचे पंढरपूर) तप करण्यासाठी आली होती.
रुक्मिणीला शोधत श्रीकृष्ण पंढरपूरात आले, पण ते प्रथम भक्त पुंडलिकाच्या घरी गेले.
पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होता. त्याने श्रीकृष्णाला थांबण्यासाठी वीट फेकली, व कृष्ण त्या विटेवर उभे राहिले.
श्रीकृष्ण विटेवर उभे राहिल्यामुळे त्यांना 'विठ्ठल' म्हणतात.
विठ्ठल जिथे पुंडलिकाच्या आग्रहाने थांबले आणि रुक्मिणी जिथे तप करत होती, ती दोन वेगवेगळी ठिकाणे असल्याने त्यांची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली गेली आहेत.