Aarti Badade
मॅग्नेशियम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. ते "मास्टर मिनरल" म्हणून ओळखले जाते, कारण ते संपूर्ण शरीराच्या आरोग्याच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते.
एका प्रौढ व्यक्तीला दिवसाला ३६०-४१० मिलीग्राम मॅग्नेशियम सेवन करणे आवश्यक आहे. याचे प्रमाण कमी झाल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
स्नायू आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. तसेच, हृदयाच्या योग्य कार्यासाठी मॅग्नेशियम अनिवार्य आहे.
मॅग्नेशियम योग्य प्रमाणात असल्याने हृदयाचे कार्य सुरळीत होते.
मॅग्नेशियम हे चिंता, नैराश्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवते.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये दुखणे आणि अंग दुखीचा त्रास होऊ शकतो.
मॅग्नेशियमची कमी भरून काढण्यासाठी, डार्क चॉकलेट, नट, बिया, आणि केळ्यासारखी फळे आपल्या आहारात समाविष्ट करा.
मॅग्नेशियममध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे दीर्घकालीन दाह कमी करण्यात मदत करतात.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, म्हणून योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन सुनिश्चित करा.
जर आहारातून पुरेसे मॅग्नेशियम मिळत नसेल, तर मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घेणे एक चांगला पर्याय असू शकतो. पण डॉकटरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.