Saisimran Ghashi
घरात पैसा न टिकण्यामागे अनेक कारणं असू शकतात, ज्योतिषशास्त्रानुसारही काही विशिष्ट कारणं मानली जातात
कुंडलीत शुक्र, मंगळ किंवा राहू-केतू यांसारख्या ग्रहांची अशुभ स्थिती असल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात.
घरात धनदायक दिशा (उत्तर व ईशान्य) अव्यवस्थित असल्यास पैसा टिकत नाही. त्या दिशेत कचर्याचे ढिगारे किंवा टॉयलेट असणेही अशुभ मानले जाते.
घरात श्री यंत्र किंवा लक्ष्मी यांची पूजा न केल्यास लक्ष्मीचं वास्तव्य कमी होतं असं मानलं जातं.
ग्रहदोषांव्यतिरिक्त, अति खर्च किंवा नियोजनाचा अभाव देखील कारणीभूत ठरतो.
घरात वास्तुशास्त्राचे उल्लंघन झाले असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाचा अपव्यय होतो.
तुटलेली भांडी, तुटकी देवमूर्ती, बंद घड्याळं ठेवणं हे आर्थिक अडचणींचं कारण बनू शकतं.
ही केवळ सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही