Shubham Banubakode
ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत चेन्नईचं नेतृत्व पु्न्हा एकदा धोनीकडे आलं आहे.
मात्र, धोनीने गेल्या दोन सामन्यात चेन्नईचे नेतृत्व केलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची गाडी रुळावर आल्याचं दिसून येत आहे.
१४ तारखेला झालेल्या सामन्यात चेन्नईनं पाच गडी राखून लखनऊचा पराभव केला.
या सामन्यात धोनीने आपलं नेतृत्व कौशल्या दाखवत चेन्नईला विजय मिळवून दिला.
या विजयानंतर धोनी आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
धोनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक ५ जेतेपद जिंकणारा कर्णधार आहे.
धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक १३३ विजय मिळवले आहेत. तसेच त्याने सर्वाधिक २२६ सामन्यांत नेतृत्व केले आहे.
संघ अडचणीत असताना शांतीत क्रांती करण्याची त्याच्या वृत्तीने CSK ला अनेक रोमहर्षक विजय मिळवून दिले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक ५०१६ धावा त्याच्या नावावर आहेत आणि मॅच फिनिशर म्हणूनही तो टॉपर आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सर्वाधिक ११ आयपीएल फायनल खेळली आहेत. कॅप्टन्सीच्या या विक्रमात त्याच्या आसपास कुणीच नाही.