मुघलांच्या जेवणात सोन्या-चांदीची पावडर का वापरली जात असे?

संतोष कानडे

मुघल

मुघल सम्राट, त्यांच्या राण्या आणि जनानखान्यातील इतर महिला नियमितपणे मौल्यवान धातूंचे सेवन करत असत. त्यात सोन्या-चांदीच्या पावडरचा वापर होई.

शाही पक्वान्न

मुघल जनानखान्यात तयार होणाऱ्या खास शाही पक्वान्नांवर, सुक्या मेव्यांवर आणि विविध मांसाहारी पदार्थांवर चांदीच्या वर्काचा सढळ हस्ते वापर केला जायचा.

शाही वैद्य

स्वतःला नेहमी तरुण आणि उत्साही ठेवण्यासाठी, राजघराण्यातील शाही वैद्यांच्या सल्ल्यानुसार, सुवर्णभस्म वापरलं जात असे.

रोगप्रतिकारक शक्ती

यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि आंतरिक ताकद वाढवण्यासाठी मदत व्हायची.

नैसर्गिक तेज

वाढते वय लपवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या भस्माचा केला जायचा.

शाही पेय

केवळ अन्नातच नव्हे, तर सम्राटांच्या शाही पेयांमध्ये, म्हणजे खास सरबते किंवा अर्ख, यामध्ये सोन्या-चांदीची भुकटी मिसळली जात असे.

ऊर्जा

या धातूंच्या सेवनामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन शरीराला एक वेगळीच ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत असे.

विलासी आहार

हा अजब आणि विलासी आहार केवळ आरोग्यासाठीच नव्हता, तर तो मुघल राजघराण्याच्या अफाट वैभवाचे आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचे एक माध्यम होते.

शारीरिक क्षमता

थोडक्यात सांगायचे तर, दीर्घायुष्य लाभणे, शारीरिक क्षमता टिकवणे आणि विलासी जीवनशैली जगणे या उद्देशाने मुघल जनानखान्यात सोन्या-चांदीची भुकटी खाल्ली जायची.

हरममध्ये बादशहाच्या बेडवर कोण जणार, कसं ठरायचं?

येथे क्लिक करा