Apurva Kulkarni
मुंबईकरांचं आयुष्य लोकल ट्रेनच्या वेळांवर अवलंबून असतं. ट्रेन चुकली, म्हणजे उशीर निश्चित! असल्याने ते धावपळीत जीवन जगतात.
मुंबईत प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. एक लोकल चुकली की वेळ म्हणजे पैसा दोंन्हीवरही परिणाम होतो.
नोकरी, व्यवसाय, शिक्षण… प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तगडी आहे. त्यामुळे पुढे जाण्यासाठी धावणं मुंबईकरांचा भाग आहे.
मुंबईतील ट्राफिक टाळण्यासाठी अनेक लोक लवकर निघतात आणि वेळेत पोहोचण्यासाठी गर्दीतून प्रवास करतात.
मुंबईत वेळ वाया घालवणं म्हणजे संधी गमावणं. म्हणूनच मुंबईकर सतत घाईत असतो.
मुंबईकर वेळेला फार महत्त्व देतात. वेळेत ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी कधी-कधी धोकादायक वाहतूक करतात.
मुंबईकरांची मानसिकता ही फास्ट काम करण्याची आहे. झपाट्याने निर्णय घेण्याची आणि जलद हालचाली करण्यात मुंबईकर पुढे असतात.
कॉर्पोरेट जगतात वेळ पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळे नेहमी मुंबईकर गर्दीतही प्रवास करतात.
मुंबईमध्ये बस, मेट्रो, ट्रेन सगळीकडे गर्दी असते. वेळ वाचवण्यासाठी आणि वेळेत पोहचण्यासाठी मुंबईकर गर्दीतही प्रवास सुरुच ठेवतात.