Payal Naik
अभिनेते नाना पाटेकर गेली कित्येक वर्ष मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वाखाणण्याजोगं काम करत आहेत.
अनेक चित्रपट गाजवणारे नाना एकेकाळी प्रचंड धूम्रपान करू लागले होते.
त्यांना धुम्रपानाचं व्यसन लागलं होतं. ते दिवसाचे तब्बल ६० सिगारेट ओढायचे.
अंघोळ करतानाही ते सिगारेट ओढायचे. आपण कधीच एवढी दारू प्यायली नाही पण सिगारेटचं व्यसन लागलं असं त्यांनी सांगितलं.
आपण सिगारेट का सोडली याबद्दल सांगताना नाना म्हणाले, 'माझ्या बहिणीच्या एकुलत्या एक मुलाचं आठ दिवसापूर्वी निधन झालं होतं.'
'मी सिगारेट पित होतो आणि मी खोकलो. त्यावर ती म्हणाली, मला अजून काय काय पाहावं लागणार आहे...'
तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी त्या दिवशी सिगारेट प्यायलो नाही. दुसऱ्या दिवशीही नाही आणि त्यानंतर मी सिगारेटला हातही लावला नाही.
पाच दिवसानंतर मी बहिणीला फोनकरून आपण सिगारेट सोडल्याचं सांगितलं.