तुळशीजवळ शाळिग्राम का ठेवतात? जाणून घ्या

Pranali Kodre

तुळशीसोबत शाळीग्राम

हिंदू धर्मशास्त्र आणि मान्यतेनुसार तुळशीच्या रोपात शाळीग्राम ठेवणे आणि पूजा करणे पवित्र मानले जाते. पण, यामागील नेमकं कारण काय?

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal

कुठे आढळतो?

शाळीग्राम हा नेपाळमधील गंडकी नदी परिसरात आढळणारा काळ्या रंगाचा पाषाण (दगड) असून त्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal

विष्णूंचे प्रतीक

शाळिग्राम हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते.

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal

विवाह

पौराणिक कथेनुसार, देवी तुळशी (वृंदा) आणि भगवान विष्णू (शाळिग्राम रूपात) यांचा विवाह झाला होता.

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal

लक्ष्मी-नारायणाची एकत्र उपस्थिती

त्यामुळे तुळशी वृंदावनात शाळीग्राम ठेवणे, ही लक्ष्मी-नारायणाची एकत्र उपस्थिती मानली जाते.

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal

ऊर्जा, सुख, शांती, समृद्धी

यासोबतच तुळशीमध्ये शाळिग्राम ठेवून दररोज जल अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे.

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद

ज्या घरात तुळशीच्या रोपासोबत शाळिग्रामाची पूजा केली जाते, तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहतो, असंही मानलं जातं.

Why Is Shaligram Kept Near Tulsi

|

Sakal

मनोकामना पूर्ण होतात

तुळशीची मंजिरी आणि शाळिग्राम यांचे एकत्रित पूजन केल्याने मनोकामना पूर्ण होतात असंही मानलं जातं.

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Why Is Shaligram Kept Near Tulsi?

|

Sakal