व्यायामानंतर आहार घेणं का गरजेचं असतं?

Monika Shinde

शरीराला पुनर्जागरणाची गरज असते

व्यायाम करताना शरीरामधील स्नायूंवर ताण येतो. या ताणामुळे स्नायूंचे छोटे तुकडे होतात. योग्य आहार घेतल्यास हे स्नायू अधिक मजबूत बनतात आणि शरीर अधिक सक्षम राहतं.

उर्जा स्तर टिकवण्यासाठी मदत होते

व्यायामाने शरीरातील ग्लायकोजन साठा कमी होतो. यामुळे थकवा जाणवतो. व्यायामानंतर कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाल्ल्यास उर्जा पातळी पूर्ववत होते आणि थकवा कमी होतो.

स्नायू वाढीसाठी प्रथिने महत्त्वाची

प्रथिने ही स्नायूंची मुख्य गरज आहे. व्यायामानंतर अंडी, दूध, दही, किंवा प्रोटीन शेक घेतल्यास स्नायूंची वाढ जलद होते. त्यामुळे शरीर घडवण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत.

योग्य वेळेत आहार का घ्यावा?

व्यायामानंतर ३०-६० मिनिटांत योग्य आहार घेतल्यास शरीर त्याचा अधिक चांगला उपयोग करू शकतं. उशीर केल्यास फायदेशीर परिणाम कमी होतात.

कोणते पदार्थ घ्यावेत?

स्प्राउट्स (मटकी, मूग), ओट्स किंवा उपमा, ड्रायफ्रूट्स (बदाम, खजूर), केळं किंवा सफरचंद, उकडलेली अंडी किंवा पनीर इत्यादी पदार्थ खावे.

काय टाळावं?

कोल्ड ड्रिंक्स, बेकरीचे पदार्थ, तेलकट, मसालेदार खाणं, पॅकेट्समधील प्रोसेस्ड फूड विशेषतः खाणे टाळावेत.

का घालतात पुरुष कानात बाळी? जाणून घ्या फायदे!

येथे क्लिक करा