Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने अनेक मालिका आणि चित्रपटातून चाहत्यांची मनं जिंकली.
मात्र तिचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत असतं. प्राजक्ता एका व्यक्तीला डेट करत होती. मात्र ते नातं फार काळ टिकलं नाही.
मात्र त्यांचं ब्रेकअप झालेलं. मुलाखतीत प्राजक्ताने त्यामागचं कारण सांगितलं होतं.
प्राजक्ता माळी म्हणाली, ‘डोक्याची मंडई होणार असेल तर माझ्या आयुष्यात मानसिक शातंतेला अधिक प्राधान्य आहे…
तुमचं डोकंच जर शांत नसेल तर, बिशाद की तुला एवढं सगळं करायला सुचेल… एका लाईफपार्टनरमुळे संपूर्ण आयुष्य बदलून जातं…’
‘तुमचं रोजचं जगणं, तुमचं भविष्य, आर्थिक गणित, मानसिक आरोग्य… लग्न फार मोठा निर्णय आहे आणि फार मोठी रिस्कदेखील…
काही मुलींना शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक गरजा असतात. म्हणून त्यांच्यासाठी लग्न फार सोपी गोष्ट आहे.
पण अध्यात्मामुळे माझ्या मानसिक आणि भावनिक गरजा फार कमी झाल्या आहेत. गरजाच संपल्या तर ते नातं देखील कशाच्या जीवावर तरणार… फक्त विश्वास आणि प्रामाणिकपणावर…
पण अशा नात्याची गॅरंटी या कलियुगात तरी कोण देणार…?’ ‘नातं प्रामाणिक असेल तरच टिकेल. आईला पण मी याच गोष्टी समजावत असते.
मी प्रेमात पडते. पण नंतर मला कळतं की हे शेवटपर्यंत नसणार आहे. यातून बाहेर पडणं योग्य आहे. अशात मी समोरच्या व्यक्तीला सांगते, मित्रा सगळं छान आहे पण जरा प्रॉब्लेम आहे. तू घरी जा…
आपण थांबूयात… असं मी सांगितलेलं देखील आहे. तू खोटं बोलतोस माझ्यासोबत… मी तुला पकडलेलं आहे… माझ्याकडे पुरावे आहे… त्याला मी रितसर जय महाराष्ट्र केलं आहे…’ असं देखील प्राजक्ता म्हणाली आहे.
का झालेला तेजश्री प्रधानचा घटस्फोट? शशांकने केलेले गंभीर आरोप