Mansi Khambe
दररोज लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेला समोरुन पाहताना त्याचं इंजिन, डबे आणि त्यात बसलेल्या प्रवाशांवर लक्ष देतो. पण कधी ट्रेनच्या सर्वात मागे लक्ष गेलं आहे का?
Railway Tail Lamp
ESakal
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एक लाल रंगाचा दिवा लावलेला दिसतो. अनेकांना हा फक्त ट्रेनचा एक भाग वाटतो. पण रेल्वेत याचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे.
Railway Tail Lamp
ESakal
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर लावलेला लाल रंगाचा दिवा हा केवळ प्रकाश म्हणून नाही. तर रेल्वेचा एखादा डब्बा रस्त्यात वेगळा किंवा नाही ना हे कळण्यास मदत होते.
Railway Tail Lamp
ESakal
ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर लावलेल्या लाल लाइटला टेल लँप म्हटलं जातं. याचं काम म्हणजे, ट्रेनचा सर्व भाग आता गेला आहे आणि ट्रेन सुरक्षित पद्धतीने पुढे जातेय हे सांगणे.
Railway Tail Lamp
ESakal
म्हणजेच, मालगाडीच्या मागे लाल रंगाचा टेल लँप दिसत असेल, तर रेल्वे कर्मचाऱ्यांना समजते की, संपूर्ण गाडी योग्यरित्या प्रवास करत आहे.
Railway Tail Lamp
ESakal
काही कारणास्तव एखादा डबा किंवा कॅन वेगळा झाला आणि त्याचा टेल लॅम्प दिसत नसेल, तर ही परिस्थिती लगेच लक्षात येऊ शकते.
Railway Tail Lamp
ESakal
अशातच आता रेल्वेने ही सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यासाठी मालगाड्यांमध्ये टेल लँप उपलब्ध करणे आणि त्याच्या वापराची व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
Railway Tail Lamp
ESakal
म्हणजेच मालगाडीच्या सर्वात मागे लाल लाइट गरजेचे असणार आहे. तसेच त्याविषयी जबाबदारी अधिकच स्पष्ट ठरवण्यात आली आहे. यामध्ये ब्रेक व्हॅनशिवाय चालणाऱ्या मालगाड्यांचाही समावेश आहे.
Railway Tail Lamp
ESakal
ब्रेक व्हॅन हा ट्रेनच्या शेवटी असलेला एक विशेष डबा असतो. याला ट्रेनची मिनी कंट्रोल रूम म्हणूनही ओळखलं जातं. अशा परिस्थितीत, ट्रेनचा शेवट ओळखण्यासाठी टेल लॅम्पची भूमिका महत्त्वाची ठरते.
Railway Tail Lamp
ESakal
हा निर्णय 2 सप्टेंबरला झालेल्या सुरक्षा समिक्षा बैठकीनंतर घेण्यात आला होता. यानंतर रेल्वे बोर्डाने या व्यवस्थेला औपचारिक निर्देश म्हणून लागू करण्यास म्हटलं.
Railway Tail Lamp
ESakal
दिवसा ट्रेनचा अखेरचा डब्बा सहज दिसू शकतो. पण रात्री किंवा दाट धुक्यांमध्ये स्थिती वेगळी असते. अशावेळी मागे लावलेल्या ला लाइट दुरून दिसण्यास मदत करतो.
Railway Tail Lamp
ESakal