जेवणापूर्वी अन् नंतर चहा-कॉफी घेणं का टाळावं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

चहा किंवा कॉफी तुम्हाला प्रचंड आवडत असेल तर या बातमीकडं जरुर लक्ष द्या.

Tea-Coffee

जेवणापूर्वी अन् जेवणानंतर चहा-कॉफी घेऊ नये असं 'दि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' अर्थात ICMRनं म्हटलं आहे.

Tea-Coffee

ICMR नं भारतीयांसाठी नुकतीच खाणपानाच्या १७ गाईडलान्सची यादी जाहीर केलीए. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी या गाईडलान्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.

Tea-Coffee

गरम तरतरी आणणारं पेय म्हणून चहा किंवा कॉफीचं सेवन भारतात सर्वात जास्त प्रमाणात केलं जातं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन या संस्थेनं म्हटलं की, माफक प्रमाणात चहा किंवा कॉफी घ्यावी.

Tea-Coffee

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, जे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते. त्याचबरोबर शारिराला याची घातक सवय लागू शकते, असं ICMRच्या संशोधकांनी लिहिलं आहे.

Tea-Coffee

150 मीलीच्या एक कप ब्रुव्ह्ड कॉफीमध्ये 80-120 मीलीग्रॅम कॅफिन असतं. तर इन्स्टंट कॉफीमध्ये 50-60 मिलीग्रॅम अन् चहामध्ये 30-65 मिलीग्रॅम कॅफिन असतं, असंही ICMRनं म्हटलंय.

Tea-Coffee

तसंच कमी प्रमाणात चहा-कॉफी घेण्याचा सल्ला दिला जातो पण त्यातील कॅफिनंच प्रमाण हे एका दिवसाला ३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये.

Tea-Coffee

त्यामुळं जेवण करण्याआधी आणि नंतर किमान तासभर चहा-कॉफी टाळावं. कारण या पेयांमध्ये टॅनिन नावाचं संयुगही असतं. जेव्हा ते सेवन केलं जातं तेव्हा ते जेवणातील लोह शरिरात शोषण्यात अडथळे निर्माण करतं.

Tea-Coffee

यामुळं जेवणातून तुमच्या शरिराला लोह मिळत नाही. त्यामुळं तुमच्यामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते.

Tea-Coffee

कारण लोहामुळं शरिरात हिमोग्लोबिन तसेच तांबड्या पेशींमध्ये प्रोटिन्स तयार होत असतात. या तांबड्या पेशी आपल्या शरिरात ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात.

Tea-Coffee