Pranali Kodre
शुभमन गिल हा भारतीय संघातील स्टार खेळाडू असून आता त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहाण्यात येत आहे.
गिलला विराट कोहलीचा भारतीय संघातील वारस म्हणून 'प्रिन्स' असंही अनेकदा संबोधलं जातं.
मात्र, त्याचं टोपननाव काका आहे, हे अनेकांना माहित नाही.
त्याच्या काका या टोपननावाबाबत त्यानेच स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हिडिओमध्ये माहिती दिली होती.
गिलने सांगितले होते की काका म्हणजे पजंबीमध्ये बाळ असा अर्थ होतो. त्यामुळे त्याला हे टोपननाव पडलं होतं.
शुभमन गिलने ७७ जर्सी क्रमांक निवडण्यामागील कारणही सांगितले. त्याला २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी त्याला ७ क्रमांकाची जर्सी हवी होती. परंतु, तो क्रमांक उपलब्ध नसल्याने त्याने ७७ असा क्रमांक निवडला होता.
तसेच शुभमनने सांगितले की सचिन तेंडुलकर हा त्याचा आदर्श आहे.
त्याचबरोबर जेव्हा सामना होतो, तेव्हा तो त्याच्या वडिलांना फोन करतो.