सकाळ डिजिटल टीम
सुरण या कंदवर्गीय भाज्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे ती सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते.
सुरणाचे कंद ओबडधोबड आकाराचे, तपकिरी रंगाचे असतात. त्याला पावसाळ्यात कोंब येतात आणि त्याचे छोटे छोटे कंद तयार होतात.
सुरणाच्या कंदामध्ये कॅल्शियम ऑक्सीलेट असल्याने भाजी करण्यापूर्वी चिंच किंवा कोकम पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे.
सुरणामध्ये पाणी (69.6 ग्रॅम), प्रोटीन (1.53 ग्रॅम), फॅट (0.17 ग्रॅम), कॅल्शियम (17 मिग्रॅ), आणि पोटॅशियम (816 मिग्रॅ) प्रमाणात असतो.
सुरणाची भाजी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते, आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
सुरणाची भाजी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
सुरणाच्या भाजीमुळे दमा, खोकला, जंत, यकृताचे विकार, आणि मुळव्याधीवर फायदे होतात. हे सर्व शारीरिक तक्रारी दूर करण्यास मदत करतात.