सकाळ वृ्त्तसेवा
जगातले सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे कधीच सोन्यात गुंतवणूक करत नाहीत. का बरं?
सोन्याला 'सेफ इन्व्हेस्टमेंट' म्हटलं जातं, पण बफे यांचं मत वेगळं आहे.
त्यांच्या मते, सोनं केवळ टिकून राहतं, पण त्यातून कोणताही नफा मिळत नाही.
“जर तुम्ही आज एक ग्रॅम सोनं विकत घेतलं, तर शंभर वर्षांनीही ते एक ग्रॅमच राहील” – वॉरेन बफे
त्यांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायला आवडते, जिथून दरवर्षी उत्पन्न येतं – जसं कंपन्या, शेअर्स.
ते सोन्याकडे 'उपयोग नसलेली संपत्ती' म्हणून पाहतात – जे नफा न कमावता फक्त ठेवून द्यावं लागतं.
त्यांनी शेअरहोल्डर्सला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं की सोनं उत्पादन करत नाही, त्यामुळे ते फायद्याचं नाही. त्यांचा फोकस नेहमी उत्पादन, उत्पन्न आणि वाढ यावर असतो. म्हणूनच सोनं त्यांच्या रडारवर नसतं.
त्यांना वाटतं की चांगल्या कंपन्या वेळेनुसार वाढतात, प्रॉफिट कमावतात. सोनं मात्र 'स्टॅग्नंट' असतं.
बफे म्हणतात, संकटातही सोनं फक्त तसंच राहतं – उत्पन्न देत नाही.