रोहित कणसे
गेल्या अनेक वर्षांपासून आपण घड्याळ वापरत आलो आहोत, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण फक्त डाव्या हाताला घड्याळ का घालतो?
यामागील कारण काय असू शकते? आपण उजव्या हाताला घड्याळ का घालत नाही? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
बहुतेक लोक सर्व कामे करण्यासाठी उजव्या हाताचा वापर करतात. अशा वेळी त्या हाताला घड्याळ बांधले तर काम करण्यात अडचण येऊ शकते.
डाव्या हाताला घड्याळ घातल्याने लेखन, टायपिंग इत्यादी कामे उजव्या हाताने सहज करता येतात. यासाठीच घड्याळ डाव्या हाताला घातले जाते.
जेव्हा आपण साखळी किंवा पट्ट्याच्या मदतीने मनगटावर घड्याळ घालतो तेव्हा ते उजव्या हाताला बांधणे कठीण होते. तसेच घड्याळ डाव्या हातावर सहजपणे बांधता येते परंतु डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसोबत उलटे घडू शकते.
आपण बहुतेक काम आपल्या उजव्या हाताने करतो. अशा परिस्थितीत या मनगटावर घड्याळ घातल्याने त्यावर ओरखडे येऊ शकतात किंवा काच फुटू शकते.
जर आपण सर्व कामे उजव्या हाताने केली आणि घड्याळ डाव्या हातात घातले तर घड्याळ अधिक सुरक्षित राहते. तसेच काम करताना ओरखडे येत नाहीत.
पूर्वीच्या काळी हातात घड्याळे घातली जात नसे. त्याऐवजी घड्याळ खिशात ठेवलेले असे, जे लवकर तुटण्याची किंवा खराब होण्याची भीती होती.
दक्षिण आफ्रिकेमध्ये एका युद्धादरम्यान सुरू असताना घड्याळ तुटण्याच्या भीतीने तेथील अधिकाऱ्यांनी घड्याळांना बेल्ट लावला आणि ते डाव्या हाताला बांधायला सुरुवात केली. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे.
भारताच्या विजयात 'विराट' वाटा; सर्वाधिक धावा, शतकं, द्विशतकं अन्...