सकाळ डिजिटल टीम
ब्राउन राईसमध्ये जास्त फायबर असतं, जे पचन तंत्राला मजबूत करतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळवायला मदत करतं.
यात असलेल्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
ब्राउन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे तो ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतो.
मॅग्नेशिअम आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करतं, ज्यामुळे हृदयारोगांचा धोका कमी होतो.
यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.
ब्राउन राईस हाडं मजबूत करतं आणि शरीरातील अवयव व्यवस्थितपणे काम करत राहतात.
लिगनान्स आणि फेनोलिक तत्व शरीरातील फ्री रॅडिकल्ससोबत लढून कॅन्सरचा धोका कमी करतात.