Monika Shinde
हॉट चॉकलेट पिण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, हॉट चॉकलेटमध्ये असलेल्या कोकोमध्ये "फेनिलथिलामाइन" आणि "सेरोटोनिन" असते. यामुळे मानसिक तणाव कमी करून मूड सुधारते.
मसाला चहा चवीसाठी स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी चांगले आहे. यात दालचिनी, लवंग, काळी मिरी, इलायची यांचा समावेश असतो. यामुळे शरीराच्या इम्यूनिटीला बळकट करतात.
हिवाळ्यात थंडीतून शरीराला उब देण्यासाठी केशर दूध एक उत्तम पर्याय आहे. रात्री केशर दूध पिण्यामुळे शांत झोप मिळते. केशरमध्ये ट्रिप्टोफॅन असते, आणि मानसिक शांती आणि झोप सुधारण्यास मदत मिळते.
आलं, हळद, तुळशीची पाने आणि वेलची घालून काढा तयार करा. हा काढा इन्फेक्शनपासून बचाव करतो आणि शरीराची इम्यूनिटी वाढवतो.
बदामांमध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन आणि फायबर्स असतात, जे की आपल्या शरीराला उर्जा देतात. बदाम दूधमध्ये कमी कॅलोरीज आणि अधिक फायबर्स असतात, ज्यामुळे वजन कमी ठेवण्यास मदत होते.
Dates : थंडीच्या दिवसात खजूर खाल्याने काय फायदा होतो? जाणून घ्या