सकाळ ऑनलाईन
ज्या महिलांचा जन्म ८, १७ किंवा २६ तारखेला झालेला असतो अंक शास्त्रानुसार त्यांचा मूळ अंक ८ समजला जातो.
या अंकाचा शनी ग्रहाशी संबंध असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या अंकाच्या महिलांचा स्वभाव काहीसा लाजाळू असतो.
या अंकाच्या महिला आपल्या मनातल्या गोष्टी कोणाशी सहजरित्या शेअर करत नाहीत.
हा मूळ अंक असलेल्या महिला या गंभीर वृत्तीच्या असतात. खूप विचार करुनच मग त्या निर्णय घेतात.
या अंकाच्या महिला या अत्यंत मेहनती असतात, एकदा का त्यांनी एखाद्या गोष्टीचा निश्चय केला की मग त्या त्यावर ठाम राहतात.
यांचा अभ्यास काहीसा मंद गतीनं सुरु होतो, पण एकदा अभ्यासात यांना रुची वाटली तर मग त्या उच्च शिखर गाठतात.
सुरुवातीला या अंकाच्या महिलांची आर्थिक स्थिती बेताचीच असते, पण म्हणूनच पैसा कमावण्यात त्या हुशार असतात.
प्रेम व्यक्त करण्याबाबत या अंकाच्या महिला खूपच लाजाळू असतात, सहजासहजी ते ही गोष्ट कोणाशी शेअर करत नाहीत.
जर या ८ क्रमांकाच्या मुलींना २ किंवा ९ क्रमांकाचा किंवा सिंह राशीतला जोडीदार मुलगा मिळाला तर त्यांचे वैवाहिक संबंध चांगले राहतात.