Pranali Kodre
वयाच्या १८व्या वर्षी भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश याने जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि इतिहास रचला.
त्याने गतविजेत्या डिंग लिरेनला मात देत हे विजेतेपद पटकावले. तो ही स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.
या विजेतेपदानंतर गुकेशला ११.३४ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
मात्र गुकेशच्या या ११.३४ कोटी रुपयांमधील ४.६७ कोटी रुपये टॅक्स म्हणून कापली जाणार आहे.
टॅक्स म्हणून कापली जाणारी रक्कम ही भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एमएस धोनीच्या आयपीएल २०२५ मधील मानधनापेक्षाही जास्त आहे.
धोनीला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ साठी ४ कोटी रुपयांना रिटेन केले आहे.
विशेष म्हणजे धोनी हा गुकेशच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे.