हसा लोकांनो हसा..! हसण्याचे आहेत ढिगभर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

जागतिक हास्य दिन

आज जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक हास्य दिन साजरा केला जात आहे.

हसणे

आजकालचे लोक रोजच्या आयुष्यात इतके व्यस्त झाले आहेत की,ते शेवटचे कधी हसले होते हे त्यांना आठवतही नाही.

हसण्याचे फायदे

काहीअभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, जर तुम्ही मोकळेपणाने हसला तर अनेक आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकता. हसण्याचे इतर फायदे जाणून घेऊ.

तणाव कमी होतो

मनमोकळेपणाने हसल्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते आणि तणाव कमी होतो.

हृदय राहते निरोगी

हसल्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो आणि हृदयविकारांपासून ही बचाव होतो.

शांत झोप लागते

मोकळेपणाने हसल्यामुळे तणाव कमी होतो, मूड सुधारते आणि शांत झोप लागते.

मूड रिफ्रेश होतो

मोकळेपणाने हसल्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो आणि मूड रिफ्रेश होतो. त्यामुळे, हसणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा आंबा-अननसाची स्मूदी

Mango-Pineapple Smoothie | esakal