जगातील पहिली 'मिस एआय' स्पर्धा; काय आहे प्रकरण?

अंकिता खाणे (Ankita Khane)

एआय

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआय हा आता आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग होत आहे.

Miss AI Competition | eSakal

इन्फ्लुएन्सर

सोशल मीडियावर देखील कित्येक 'एआय इन्फ्लुएन्सर्स'चे अकाउंट्स पहायला मिळत आहेत.

Miss AI Competition | eSakal

मिस एआय

या सगळ्यातच आता चक्क 'मिस एआय' स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

Miss AI Competition | eSakal

स्पर्धा

जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक एआय इन्फ्लुएन्सर मॉडेल निवडण्यासाठी पहिल्यांदाच स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

Miss AI Competition | eSakal

सहभाग

वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्सने (WAIC) या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेमध्ये एआय मॉडेलला हँडल करणारा कोणताही क्रिएटर सहभागी होऊ शकतो.

Miss AI Competition | eSakal

अटी

एआय मॉडेलच्या क्रिएटरचं सोशल मीडिया अकाउंट असायला हवं आणि क्रिएटरचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असायला हवं या दोन मुख्य अटी आहेत.

Miss AI Competition | eSakal

निकष

यात एआय मॉडेलची सुंदरता, संतुलन आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या गोष्टी तपासल्या जातील. सोबतच, या एआय मॉडेलची लोकप्रियता किती आहे, सोशल मीडियावर किती फॉलोवर्स आहेत हेदेखील पाहिलं जाईल.

Miss AI Competition | eSakal

बक्षीस

या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या एआय मॉडेलच्या क्रिएटरला 20 हजार डॉलर्स (सुमारे 16.7 लाख रुपये) किंमतीचं बक्षीस देण्यात येईल.

Miss AI Competition | eSakal
AI Death Prediction | eSakal