Shubham Banubakode
27 सप्टेंबर 1825 रोजी इंग्लंडमध्ये स्टॉकटन ते डार्लिंगटन या मार्गावर जगातील पहिली रेल्वे धावली होती.
लोकोमोशन नंबर 1, असं या रेल्वेचं नाव होतं. प्रसिद्ध अभियंता जॉर्ज स्टीफन्सन यांनी या रेल्वेचं इंजिन डिझाईन केलं होतं. रॉबर्ट स्टीफन्सन अँड कंपनीने ती बनवली होती.
हे रेल्वे इंजिन वाफेवर चालणारं होतं. तिचा वेग 15 मैल प्रतितास इतका होता.
लोकोमोशन नंबर 1 मध्ये 450 ते 600 प्रवासी बसण्याची व्यवस्था होती.
रेल्वेला रुळावर आणण्यासाठी दोरखंड आणि घोड्यांचा वापर करण्यात आला होता.ही वाहतूक व्यवस्थेतील सर्वात मोठी क्रांती होती.
जॉर्ज स्टीफन्सन यांचं योगदान आजही रेल्वे इतिहासात महत्त्वाचे मानलं जातं.