WPL Final: दिल्ली विरुद्ध बेंगलोर, आतापर्यंत कोण कोणावर ठरलंय वरचढ?

सकाळ डिजिटल टीम

WPL Final

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात 17 मार्च रोजी रंगणार आहे.

WPL 2024 Final, RCB vs DC | X/wplt20

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केलेला असल्याने यंदा डब्ल्युपीएलला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.

WPL Trophy | X/wplt20

पहिले विजेतेपद

या दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकला, तरी त्या संघाच्या फ्रँचायझीचे हे पहिले विजेतेपदही ठरणार आहे. कारण या दोन्ही संघांच्या फ्रँचायझीला अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेली नाही.

WPL 2024 Final, RCB vs DC | X/wplt20

दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी

डब्ल्युपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीत 8 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आणि अंतिम सामन्यात थेट प्रवेश केला आहे.

Delhi Capitals | X/wplt20

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची कामगिरी

डब्ल्युपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर साखळी फेरीत 8 पैकी 4 सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांनी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम सामना गाठला.

Royal Challengers Bangalore | X/wplt20

हेड-टू-हेड

दरम्यान, आत्तापर्यंत डब्ल्युपीएलच्या दोन्ही हंगामात मिळून दिल्ली आणि बेंगलोर संघात चार सामने खेळवण्यात आले आहेत.

WPL 2024 Final, RCB vs DC | X/wplt20

दिल्लीचं वर्चस्व

विशेष म्हणजे या चारही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. आत्तापर्यंत एकदाही बेंगलोरला दिल्लीवर डब्ल्युपीएलमध्ये विजय मिळवता आलेला नाही.

Delhi Capitals | X/wplt20

Ranji Trophy 2023-24: सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज

R Sai Kishore | X/BCCIDomestic