सकाळ डिजिटल टीम
स्त्रीच्या आयुष्यातील पाळी (मासिक धर्म) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, मध्यमवयीन स्त्रियांना (३५ वर्षांवरील वयोगट) या काळात अधिक त्रास जाणवतो.
या त्रासांना सामोरे जाण्यासाठी योग, आहार आणि मानसिक संतुलनासाठी कोणते उपाय आहेस जाणून घ्या.
कसे करावे? पाठीवर झोपा, पाय वाकवून तळवे एकत्र आणा, गुडघे बाजूला सैल सोडा.
सुप्त बद्धकोनासन केल्याने हार्मोनल संतुलन सुधारते, पोटातील ताण कमी होतो, मानसिक शांतता मिळते.
गुडघ्यावर बसा, शरीर पुढे झुकवा, कपाळ जमिनीवर ठेवा, हात पुढे पसरवा.
बालासन केल्याने पाठदुखी आणि पोटदुखी कमी करते, शरीर, मनाला आराम देते.
पाठीवर झोपा, पाय छातीजवळ वाकवून आणा, हातांनी घट्ट धरून ठेवा.
पवनमुक्तासन केल्याने गॅस, सूज कमी होते तसेच पचन सुधारतो.
पाठीवर झोपा, पाय वाकवून कंबर हळूच वर उचला, हात जमिनीवर ठेवा.
सेतूबंधासन केल्याने हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते तसेच पाठदुखी ही कमी करते.