'गौतमी'चे चाहते असाल पण...तिचा संघर्षही जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलचं वारं काहीसं ओसरलं असलं तरी तिची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही.

Gautami Patil

तिच्या डान्सवर अनेक जण फिदा असतात, आपल्या नृत्यानं ती रसिकांना खूष करुन टाकते.

Gautami Patil

पण तिच्या या प्रसिद्धीच्या शिखरामागं देखील मोठा संघर्ष आहे.

Gautami Patil

आपला हा संघर्ष तिनं यापूर्वी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून सांगितला आहे.

Gautami Patil

वडिलांची साथ नसल्यामुळं मला आज हे सगळं करावं लागलं, बाकी काही नाही.

Gautami Patil

दारुच्या व्यसनापोटी वडिलांचं कुटुंबाकडं दुर्लक्ष झालं, त्यामुळं गौतमी आपल्या आईसह वेगळी राहू लागली.

Gautami Patil

आईच्या अपघातानंतर घराची जबाबदारी तिच्यावर आली, त्यानंतर तिनं रेकॉर्ड डान्सच्या दुनियेत प्रवेश केला.

Gautami Patil

पण या क्षेत्रात येणं तिच्यासाठी इतकं सोप नव्हतं, कारण ठामपणे या क्षेत्रात काम करत राहणं वाटतं तेवढं सोप नाही, असंही ती सांगते.

Gautami Patil

विविध कार्यक्रमात जसं जत्रा, वाढदिवस, विविध सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये गौतमीच्या डान्सला खूप मागणी आहे.

Gautami Patil