Saisimran Ghashi
कॅल्शियमची कमतरता झाल्यास हाडे दुखणे, हात पाय दुखणे अंबई थकवा जाणवू शकतो.
काही पदार्थ हाडांना कॅल्शियम देण्यास मदत करू शकतात, त्यामुळे तुमच्या आहारात त्यांचा समावेश करा.
दूध, दही, ताक आणि पनीर यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. हे हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक असतात.
पालक आणि ब्रोकोली या हिरव्या भाज्या कॅल्शियमच्या चांगल्या स्रोतांमध्ये गिनल्या जातात. या भाज्या हाडांचे आरोग्य सुधारतात आणि कॅल्शियम शोषण वाढवतात.
तिळ आणि बदाम यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतात. यामुळे हाडांची घनता वाढवण्यास मदत होते.
संत्री, मोसंबी आणि लिंबू यामध्ये व्हिटॅमिन C असतो, ज्यामुळे कॅल्शियमच्या शोषणात सुधारणा होते. तसेच, हाडांच्या सुदृढतेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
सॅल्मन आणि सार्डिन सारख्या मासांमध्ये कॅल्शियमचा समृद्ध स्रोत असतो. यामुळे हाडांच्या संरचनेला बळ मिळतं.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.