Aarti Badade
यकृत शरीरातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अवयव आहे. त्याच्या खराबीची लक्षणे सुरुवातीस सौम्य असतात.
जेव्हा यकृतावर ताण येतो, तेव्हा अनेकदा सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित केली जातात.
सतत थकवा जाणवणे आणि अशक्त वाटणे हे यकृताच्या नुकसानाचे प्रमुख लक्षण असू शकते.
बिलीरुबिन वाढल्याने त्वचा व डोळे पिवळे पडतात – हे यकृत नीट कार्य न केल्याचे संकेत आहेत.
पोटाच्या वरच्या उजव्या बाजूस वेदना किंवा दडपण जाणवणे हे यकृतविकाराचे लक्षण असू शकते.
जर यकृत कार्य करत नसेल, तर मलाचा रंग फिकट होतो व लघवी गडद होते.
तळवे व तलाचे भाग खाजवणे, विशेषतः रात्री, हे यकृताच्या समस्येचे सौम्य पण गंभीर लक्षण आहे.
हे लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार करा.
ही माहिती सामान्य आहे. कोणतेही उपचार सुरू करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.