कोण म्हणतं होत नाही... फेमस यूट्यूबरनं सांगितलं ५० किलो वजन घटवण्यामागचं 'सिक्रेट'

रोहित कणसे

लठ्ठ व्यक्तींना स्वतःचं वजन कमी करणं बऱ्याचदा अशक्य वाटतं, ज्यांना हे शक्य नाही असं वाटतं त्यांनी फेमस यूट्यूबर आणि स्टँडअप कॉमिडीयन तन्मय भट याचा वजन कमी करण्याचा प्रवास नक्की वाचला पाहिजे.

tanmay bhat weight loss Journey

तन्मयने गेल्या काही दिवसात आपलं वजन सुमारे 50 किलोने कमी केलंय, त्याचा हा वजन कमी करण्याचा प्रवास सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

tanmay bhat weight loss Journey

नुकतेच एका पॉडकास्टमध्ये तन्मय त्याच्या नियमित दिनचर्येबद्दल सांगताना दिसतोय, तसेच तन्मय त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून देखील त्याच्या वेट लॉस जर्नीबद्दल चाहत्यांना माहिती देत असतो.

tanmay bhat weight loss Journey

सातत्य महत्वाचे

कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये नियमितचा गरजेचे असते त्यामुळं स्वतःसाठी वेळ काढाला पाहिजे. तन्मय रोज 5 ते 7:30 च्या दरम्यान वर्कआउट करतो, या अडीच तासांमध्ये तो फक्त फिटनेसवर फोकस असतो.

tanmay bhat weight loss Journey

फक्त वीस मिनीटं

तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही दररोज स्वतःसाठी 20 मिनिटे वेळ काढलात तर तुम्ही तंदुरुस्त राहू शकता, तसंट आठवड्यातून 3-4 वेळा व्यायाम आणि कुठलीही स्पोर्ट अॅक्टिव्हीटी फिट होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. .

tanmay bhat weight loss Journey

रुटीन महत्वाचे आहे

वजन कमी करण्याबद्दल तज्ज्ञ सांगतात की कोणतीही नवीन जीवनशैली स्थिर होण्यास वेळ लागू शकतो. पण साधारण महिनाभर वर्कआउट रूटीन चुकवू नये यासाठी प्रयत्न करत रहावे. एक महिन्याच्या काळात केलेल्या प्रयत्नानंतर तो तुमच्या दिनचर्येचा भाग बनेल.

tanmay bhat weight loss Journey

मजा आली पाहिजे

कॉमेडियन तन्मयने सांगितले की 2022 मध्ये त्याने जिमला जायला सुरुवात केली, पण जिममध्ये जाणे, सकस आहार घेणे आणि जीवनशैली बदलणे यामुळे त्याला मजा येत नव्हती.

tanmay bhat weight loss Journey

काम सोप्पं होईल

मग त्याने बाहेर बॅडमिंटन खेळणे सुरू केले, तीन ते चार महिने सतत बॅडमिंटन खेळल्याने वजन कमी होण्यास मदत झाली आणि नंतर वेट लिफ्टिंगही सुरू केले. त्यामुळे वजन कमी करणे सोपे झाले.

tanmay bhat weight loss Journey

55 किलो वजन कमी केलं

2022 मध्ये, तन्मय भट्टचे वजन सुमारे 168 किलो होते, जे त्याने सध्या 113 किलोपर्यंत कमी केले आहे. हे रुटीन फॉलो करून त्याने सुमारे 55 किलो वजन कमी केले आहे.

tanmay bhat weight loss Journey

हेल्दी हॅबिट्स

वजन कमी करण्यासाठी महत्वाचे म्हणजे हेल्दी सवयी अंगीकारण्यास सुरुवात करा.

tanmay bhat weight loss Journey

नुसता विचार करणे सोडा

जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचे असेल तर नुसता विचार करण्यापेक्षा त्यावर कृती करायला सुरुवात करा. व्यायाम सुरू करा आणि तो नियमितपणे करा.

tanmay bhat weight loss Journey

मजा येईल असं काहीतरी शोधा

खूप स्ट्रिक्ट फिटनेस रुटीन फॉलो करण्याएवजी तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या करायला लागा, यामुळे तुमचा इंटरेस्ट टिकून राहिल आणि तुम्ही फिट देखील राहाल.

tanmay bhat weight loss Journey

ट्रोल करणाऱ्यांना आयेशा टाकियाचं सडेतोड उत्तर

Ayesha Takia | esakal
येथे क्लिक करा