सकाळ वृत्तसेवा
झीनत अमान ही सत्तरीच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री.
तिने त्या सुवर्ण काळात अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
आता ती पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली असून तिच्या आगामी ‘बन टिक्की’ चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
ज्यामध्ये अभय देओल, शबाना आझमी, नुसरत भरुचा आणि रोहन सिंग यांसारखे प्रतिभावान कलाकारही झळकणार आहेत.
झीनत अमानसाठी हा चित्रपट बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतण्याचा आनंददायक क्षण ठरणार आहे.
हा चित्रपट मनीष मल्होत्राच्या स्टेज ५ प्रॉडक्शन आणि मुकेश अंबानीच्या जिओ स्टुडिओद्वारे केला जात आहे.
‘बन टिक्की’चा वर्ल्ड प्रीमियर ३६ व्या पाम स्प्रिंग्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ५ जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये होणार आहे.
अभय देओलनेदेखील एका मुलाखतीत सांगितले की, “‘बन टिक्की’ ही माझ्या करिअरमधील आवडत्या स्क्रिप्ट्सपैकी एक आहे