Aarti Badade
२० जून २०२५ रोजी मंगळ कर्क राशीत आणि शनि मीन राशीत असताना दोघेही एकमेकांशी षडाष्टक (६-८ घरांत) योग तयार करणार आहेत. हा योग खूप अशुभ मानला जातो.
मेष राशीच्या लोकांना मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, सहकाऱ्यांशी वाद, कोर्ट केसेसची शक्यता निर्माण होऊ शकते.
कर्क राशीसाठी मन अस्थिर, पचन समस्या, पालकांच्या तब्येतीची चिंता आणि आर्थिक दडपण वाढू शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांत संघर्ष, खर्चात वाढ, कायदेशीर अडचणी, वाद वाढण्याची शक्यता आहे.
मकर राशीच्या लोकांना जुने आजार, कामात मंदी, अधीनस्थांशी वाद, मानसिक थकवा जाणवू शकतो.
मीन राशीसाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, हृदयाशी संबंधित चिंता, अचानक खर्च यांचा सामना करावा लागू शकतो.
या काळात कोणताही मोठा निर्णय पुढे ढकलावा, गुंतवणूक टाळावी, मानसिक स्थैर्य राखावे आणि उपाय नियमित करावेत. योगाचा प्रभाव जाणून आणि उपाय करून अशुभ परिणाम कमी करा.