आंध्र प्रदेश, तेलंगणाने टाकले गुजरातला मागे

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

छत्तीसगढनंतर या यादीमध्ये अनुक्रमे मध्य प्रदेश, हरयाना, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा या यादीमध्ये तब्बल 10 वा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले आहे

नवी दिल्ली - देशात व्यवसाय करण्यासाठी सर्वांत सुखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आंध्र प्रदेश राज्याने अग्रस्थान मिळविले आहे; तर तेलंगण राज्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या दोन राज्यांमध्ये अग्रस्थानासाठी तीव्र चुरस होती.

व्यवसायास पूरक वातावरण तयार करण्याच्या या मोहिमेमध्ये गुजरात राज्याची घसरण झाल्याचे दिसून आले असून या यादीमध्ये गुजरातला तिसरे स्थान मिळाले आहे. छत्तीसगढ राज्याने चौथे स्थान कायम राखले आहे. छत्तीसगढनंतर या यादीमध्ये अनुक्रमे मध्य प्रदेश, हरयाना, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा या यादीमध्ये तब्बल 10 वा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि बिहार या राज्यांना या यादीमध्ये "उदयोन्मुख नेतृत्व' असे संबोधण्यात आले आहे; तर हिमाचल प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्ली या राज्यांनी कामगिरीमध्ये अजून सुधारणा करणे आवश्‍यक असल्याची सूचना करण्यात आली आहे. औद्योगिक विकास विभाग पोलिसदल व जागतिक बॅंकेच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

Web Title: andhra pradesh best place to start business