बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध! #Budget2018

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

बिटकॉईनची जगभरात आणि भारतातही वाढती मागणी आहे. मात्र, त्याचवेळी बिटकॉईन हा काळा पैसा लपविण्याचा मार्ग ठरू लागला आहे. त्यामुळे सरकारने बिटकॉईनसारख्या व्हर्च्युअल करन्सीविरुद्ध पावले उचललायला सुरूवात केली होती.

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले. 

बिटकॉईनची जगभरात आणि भारतातही वाढती मागणी आहे. मात्र, त्याचवेळी बिटकॉईन हा काळा पैसा लपविण्याचा मार्ग ठरू लागला आहे. त्यामुळे सरकारने बिटकॉईनसारख्या व्हर्च्युअल करन्सीविरुद्ध पावले उचललायला सुरूवात केली होती. 

केंद्रीय अर्थसंकल्पाचे संपूर्ण कव्हरेज

बिटकॉईन या चलनाएेवजी ब्लॉकचेन या क्रिप्टोकरन्सीसाठीच्या तंत्रज्ञानाचा आधार भारत घेईल, असे जेटली यांनी म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकही क्रिप्टोकरन्सीकडे संशयाने पाहते आहे. बिटकॉईनसारखी भारताची स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचा विचार बँक करते आहे. त्याचवेळी, बिटकॉईनला अधिकृत चलन म्हणून मान्यता देणे जेटली यांनी नाकारले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पः जसा सादर झाला तसा...

Web Title: budget 2018 union budget arun jaitley Marathi news bitcoin illegal