केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत महागाईचे प्रमाण वाढल्यास महागाई भत्ता मंजुर केला जातो. परंतु दोन टक्के वाढीमुळे भरपाई होऊ शकत नसल्याचे कामगार संघटनांचे मत आहे

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात या महिन्यात 2 ते 4 टक्क्यांची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु कामगार संघटनांनी या वाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

"ठरलेल्या सुत्राप्रमाणे 1 जानेवारी, 2017 पासून 2 टक्के महागाई भत्ता लागू होईल", असे मत केंद्र सरकार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के के एन कट्टी यांनी व्यक्त केले. परंतु  ही वाढ अतिशय तुटपुंजी असून महागाई भत्ता वाढीसाठीचा निर्देशांक 'कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स'(सीपीआय-आयडब्लू) आणि प्रत्यक्षात दिला जाणारा महागाई भत्ता यात फार फरक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत महागाईचे प्रमाण वाढल्यास महागाई भत्ता मंजुर केला जातो. परंतु दोन टक्के वाढीमुळे भरपाई होऊ शकत नसल्याचे कामगार संघटनांचे मत आहे.

Web Title: Centre to hike dearness allowance by 2% from January 1