सहारांच्या "ऍम्बी व्हॅली'चा लिलाव करा - सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

सहारा समुह पैसे भरण्यास अपयशी झाल्यास अॅम्बी व्हॅली टाऊनशिप प्रकल्पाचा लिलाव करून पैसे वसूल करण्यात येतील, असा इशारा गेल्यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाविरोधात कठोर पाऊल उचलत अॅम्बी व्हॅली टाऊनशिप प्रकल्पाचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. सहारा समुह पैसे भरण्यास अपयशी झाल्यास अॅम्बी व्हॅली टाऊनशिप प्रकल्पाचा लिलाव करून पैसे वसूल करण्यात येतील, असा इशारा गेल्यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता. 

सहारा समुहाला पैसे परत करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. समुहाचे मालक सुब्रतो रॉय यांच्या आईच्या निधनानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. परंतु न्यायालयाकडून वेळोवेळी मिळालेल्या मुदतवाढीचा समुहाने गैरफायदा घेतल्याचे न्यायालयीन खंडपीठाने म्हटले आहे.  

आधीच्या सुनावण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाकडून जोपर्यंत पैसे दिले जात नाही तोपर्यंत अॅम्बी व्हॅली टाऊनशिप प्रकल्प जप्त करण्याचा आदेश दिला होता. सहारा समूहाकडून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकाच्या खात्यामध्ये पाच हजार कोटी जमा केले जात नाही तोपर्यंत हा प्रकल्प जप्त करण्यात आला होता. 

Web Title: SC orders auction of Sahara's Aamby Valley