अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - अल्पबचत योजनांवरील व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर तिमाहीकरिता 0.1 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरही (पीपीएफ) 8.1 टक्‍क्‍यांऐवजी 8 टक्के एवढा झाला आहे. आवर्ती ठेव योजनांवर 7.3 टक्के दराने व्याज मिळणार आहे. परंतु बचत खात्यांवरील व्याजदर 4 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

याशिवाय, किसान विकास पत्र, जेष्ठ नागरिक ठेव योजना व मासिक उत्पन्न खाते योजनांवरील व्याजदर अनुक्रमे 7.7%, 8.5% आणि 7.7% करण्यात आला आहे. किसान विकास पत्र योजनेच्या मुदतपुर्तीचा काळ 110 महिन्यांऐवजी 112 महिने करण्यात आला आहे. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 8.5 टक्के झाला आहे. गेल्या तिमाहीत हा दर 8.6 टक्के होता. याशिवाय, 1,2,3,4 आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात प्रत्येकी 0.1 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली आहे.

Web Title: Thrift interest rate reduction schemes