'ब्रेक्‍झिट'मुळे लंडनचे आर्थिक महत्त्व ओसरेल...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

बर्लिन - "ब्रेक्‍झिट'मुळे जागतिक आर्थिक सेवांच्या दृष्टिकोनामधून सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या लंडनचे महत्त्व कमी होण्याची शक्‍यता असल्याचा इशारा जर्मनीतील मध्यवर्ती बॅंक असलेल्या "बुंडेसबॅंक'च्या कार्यकारी समितीचे सभासद असलेल्या डॉ. अँद्रिआस डोंब्रेट यांनी दिला आहे.

जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनामधून लंडन हे युरोपचे प्रवेशद्वार समजले जाते. सध्या लंडन हे शहर युरोपिअन युनियनच्या आर्थिक सेवांची राजधानीचे केंद्र आहे. इयुच्या परकीय विनिमयासंदर्भातील सुमारे 80% व्यवहार हे लंडनमधूनच होतात. या पार्श्‍वभूमीवर डोंब्रेट यांनी दिलेला अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

बॅंकिंग क्षेत्रातील नियमांमध्ये समतोल आणला; तरी आता ब्रिटन आणि युरोपिअन युनियनमध्ये समान बाजारपेठ राहणार नाही, असे डोंब्रेट यांनी म्हटले आहे. ब्रेक्‍झिटसंदर्भातील प्रदीर्घ राजनैतिक चर्चेचा प्रवास आता पुढे कसा होईल, यासंदर्भात अद्याप मोठी अनिश्‍चितता असल्याचे डोंब्रेट यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले -

  • ब्रेक्‍झिटनंतर करसवलत आणि आर्थिक नियमनात शिथिलता आणत ब्रिटन "युरोपचे सिंगापूर' होण्याचा प्रयत्न करेल
  • ब्रेक्‍झिटचा निर्णय हा सध्या पुन:राष्ट्रीयीकरणाच्या असलेल्या वातावरणास साजेसाच
  • मात्र यामुळे आपल्या सर्वांवरच नकारात्मक परिणाम होईल. या पार्श्‍वभूमीवर, आपण सर्वांनीच पुन:राष्ट्रीयीकरणाच्या या मतप्रवाहाचा आणखी प्रसार रोखावयास हवा
Web Title: Germany warns london over Brexit